Wednesday, July 15, 2020

स्वातंत्र लढ्यातील योद्धा..

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत अनेकांचेविशेषकरून
 महिलांचे  योगदान पडदद्यामगे गेलेले दिसते. त्यातलेच एक नाव म्हणजे अरूणा असफ अली होय. यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत विशेषकरून १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यांचे व्यक्तीमत्व झुजारू आणि प्रेरणा देणारे आहे. ज्या उर्मीने त्यांनी आपला जीवनकाळ समाजासाठी काम करण्यात घालवला होता. त्याकाळात जे चुकीचे वाटले त्याविरोधात त्या बोलल्या जसे की १९३२ मधे तिहार जेलमध्ये असताना त्यांनी राजकीय कैद्यांना मिळणाऱ्या भेदभावाच्या विरोधात 'हंगर स्ट्राईक' केली होती. अरूणा यांचा जन्म एका ब्राम्हो कुटुंबात झाला होता. वैयक्तीक आयुष्यातही त्यांनी बंड केले. त्यांनी जाती- धर्माची बंधने तोडून घरच्यांचा विरोध असतानाही असफ अली यांच्याशी लग्न केले. त्यांचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य एकमेकांशी सुसंगत आणि सुसंवादी होते. आज आपल्यापैकी किती जणांचे आयुष्य असे सुसंगत असते हे ज्यानी-त्यानी स्वतःला विचारण्याजोगा प्रश्न आहे. जस उदाहरण द्यायचे झाले तर अनेकजण फक्त म्हणतात कि मी हुंड्याच्या विरोधात आहे पण प्रत्यक्षात वेगळ्या स्वरूपात हुंडा घेऊन लग्न करताना दिसतात. दुसरे उदाहरण म्हणजे अनेकजण म्हणतात कि आम्ही जातीवरून भेदभाव करत नाही मात्र त्यांच्या प्रत्यक्ष कृतीत जातीतच लग्न केलेले दिसते. हे बदलायची गरज आहे. अरूणा यांनी या सुसंगतपणाचे मर्म जाणले होते. पुढे त्या कॉग्रेस पार्टीच्या मेंबर झाल्या होत्या. १९४२ च्या आंदोलनात जेव्हा कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांना इंग्रज सरकारने अटक केली होती तेव्हा पुढाकार घेवून त्यांनी भारत छोडो आंदोलनाचा समारोप केला होता. यावरून त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य दिसते. त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील "ग्रॅंड ओल्ड लेडी" म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून आजच्या प्रश्नावर आपण बोलले पाहिजे, लढले पाहिजे. आत्ताचा ताजा मुद्दा म्हणजे नागरिकत्वसंशोधन विधेयकाविरोधात शांतीपूर्ण आणि संवैधानिक मार्गाने काम करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांना खोट्या केसेस मधे फसवून जे अटकसत्र सरकारने चालवले आहे त्याचा विरोध आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. तरच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेकांचे योगदान सार्थक होइल आणि संविधानाच्या रूपाने स्वातंत्र्य लढ्यातून जन्म घेतलेल्या बंधुता, जगण्याचा हक्क, विरोध करण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची गळचेपी होउ न देता त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरीकाची आहे. यासाठी प्रेरण्या देणाऱ्या झुझारू, लढाऊ नेतृत्व असणाऱ्या अरुणा असफ अली यांना विनम्र अभिवादन!

#ArunaAsafAli #FreedomStruggle #

By
Dr Ghapesh Pundalikrao Dhawale,
      ghapesh84@gmaul.com
      M. 8600044560

No comments:

Post a Comment