Friday, July 17, 2020

वात्सववादी साहित्यीक अन्ना भाऊ..

तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच आण्णा भाऊ साठे यांचा जन्म (१ ऑगस्ट १९२० - १८ जुलै १९६९) सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. अण्णाभाऊ शाळेत शिकले नाहीत. ते केवळ दीड दिवस शाळेत गेले होते. मात्र शाळेत शिक्षकांकडून होणारी मारहाण, अपमानास्पद वागणूक यामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. ते परत शाळेत गेलेच नाही. लहानपणीच  त्यांना जातिव्यवस्थेचे चटके सोसावे लागले. पोटापाण्यासाठी त्यांनी चालतच मुंबई गाठली. मुंबईत असताना चळवळींशी त्यांचा संबंध आला. दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांसोबत त्यांनी 'लाल बावटा' हे कला पथक स्थापन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासोबतच अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे त्यांनी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी जोडत लिहिले. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे 'फकीरा' होय. त्यांच्या साहित्यात जगण्याचा संघर्ष होता, स्वतः अनुभवलेलं आयुष्य त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. त्यांनी लिखाणातून चित्रा, वैजंता अशा सशक्त नायिका उभ्या केल्या. पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यात त्यांनी उच्चारलेले वाक्य होते, "ही पृथ्वी श्रमिक आणि दलितांच्या तळहातावर तरलेली आहे". आचार्य अत्रे यांनी म्हटलं होतं, जगण्यासाठी मरणाऱ्या माणसांची कथा अण्णाभाऊंनी लिहिली.  
लोकशाहीर आण्णा भाऊ साठेंना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

By 
Dr Ghapesh Dhawale Nagpur
      ghapesh84@gmail.com
       M. 8600044560

No comments:

Post a Comment