Wednesday, May 27, 2020

नेहरु हुकुमशहा का झाले नाहीत?

       नेहरु हुकुमशहा का झाले नाहीत. 1929 मध्ये नेहरु कांग्रेस चे अध्यक्ष झाले. 1964 पर्यन्त  म्हनजे मृत्यूपर्यंत ते भारतातचे प्रधानमंत्री होते. साडेचार दशके भारतावर राज्य करनारे नेहरु या देशाचे हुकुमशहा कसे झाले नाहीत. असा प्रश्न अनेक पाश्चात्य पत्रकारांना पडतो. ईतर अनेक देशात झाले ते भारतात का झाले नाही? 

नेहरु हुकुमशहा का झाले नाहीत ' हे समजण्यासाठी नेहरुचींच काही विधाने आपन बघु. निवडणुकीच्या ऐका अनुभवानंतर नेहरु लीहततात. 'पुष्कळ वेळा निवडणुकीच्या वेळीच तुमच्यांतल्या घाणेरड्या वृत्तीला वाव मिळतो, मंग गेंड्याच्या कातडी सारख्या नीगरगट्टांना निवडून दीले जानार का ? आरडाओरडा तयार करण्यासठी लागणरा आवाज आणि भाषणाच्या नावाखाली थापा ठोकन्यांचे कसब ज्यांच्याकडे आहे. 'खोटे बोल, पन रेंटुन बोल'अशी चलाखी ज्यांना जमते ,त्यांनाच लोक निवडून देनार का ? नीवडनुक हे अश्या खोटारड्या लोकांसाठी आरक्षीत कुरन  करुन टाकायचे का? ते पुढे म्हणतात मतदारसंघाचा आकार जीथे मोठा, तीथे एखाद्या खोट्या मुद्यावरुन नीवडनुक ऐका बाजुला खेचणे सहज शक्य , होत अस. या प्रकाराची मला भीती वाटते. नेहरु हे बोलले सत्तर ऐंशी वर्षापूर्वी , पन तुम्हाला अगदी अलीकडच्या नीवडनुकीची आठवण आली असेल. 

नेहरु अत्यातिक संवेदनशील, त्यांग, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, या मुल्यांबद्लची त्यांची बांधीलकी पक्की. त्यांमुळे विजय मीळवुन देखील नीवडनुकीतील अश्या अनुभवांनी ते व्थथित होते. खोटं बोल, पन रेटुन बोल, अशी चलाखी असनारे गेंड्यांच्या कातडीचे लोक निवडणुकिच्या रिंगणात उतरने हेंच भविष्यात लोकशाही समोरील आव्हान ठरनार आहे, त्यांना तेव्हाच कडुन चुकले होते. 

भारतासमोर जे देश स्वतंत्र्य झाले. त्यांपैकी अनेक देश हुकुमशहा च्या टाचेखाली  गेले. किंवा लष्करी कवायती मध्ये हरवुन गेले. देशांचा हुकुमशहा होण्याचा मोह अनेक भल्याभल्या क्रांतीकारकांना आवरता आला नाही.पन नेहरुची गोष्टच वेगळी.त्यांचे विरोधकही नेहरुंच्या लोकशाही वादी असन्या विषयी शंका घेवु शकत नाहीत. यांची ऐक छान आठवण प्रसीद्ध पत्रकार ईदर मल्होत्रा यानी लीहुन ठेवलेली आहे. 

गोष्ट 1937 च्या नोव्हेंबर महिन्यातील. कोलकत्यांतुन  प्रकाशीत होणाऱ्या 'मॉडर्न रीव्यु' ह्या ख्यातनाम मासिकात नेहरु वर ऐक निनावी लेख छापुन आला. "नेहरु सारखी माणस धोकादायक असतात आनी ती हुकुमशहा होण्याची भीती असते" असा त्या लेखांचा ऐकुन सुरू होता. जिवंतपणीच दंथ कथा होणाऱ्या अश्या वलयांकित व्यक्तीमत्वापासुन आपन सावध असायला हवे. नेहरु स्वताला मानतात लोकशाहीवादी आणि समाजवादी पण किंचित काही घडले तर ते हुकुमशहा व्हायला काहीच वेळ नाही लागणार. आपन सजग व्हायला हवेत, कारन राजे आणि सम्राट आपणाला नको आहेत! असे त्या लेखात शेवटी म्हटले होते. हा लेख अन्य कुनी नाही तर नेहरु नीच लीहला होता.असा लेख तुम्ही का लीहलात? असा प्रश्न ऐकाने नेहरुनां वीचारला. तेव्हा नेहरु म्हणाले, ' गेल्या काही दीवसात मी खुप दौरे केले. मोटारीन, विमानाने, आगगाडीने, बोटीने, होडीने, काही अंतर दुचाकीने कापले, तर काही पाई चाललो. प्रत्यक ठीकानी मी लोकांना हवा असतो. 'नीवडनुक जिंकून देनारा' अशी माझी ख्याती झालेली आहे. एकदा अशी ख्यात झाली की मानसाला हुकुमशहा होण्याचे वेध लागतात! अस बोलुन नेहरु स्तब्ध झालेत, नी पुढे म्हणाले की,आपन सर्वानी नेहमीच ओळखले पाहीजे. कोणताही ऐक चेहरा देशापेक्षा मोठा होनार नाही., यासाठी  आपन सजग असले पाहीजे. '
नेहरूचा हा सावधगिरीचा ईशारा आज वारवार आठवतोय, आणि  भविष्यातील लोकशाहीची परीस्थीतीवर मार्मिक भाष्य करतोय...

  by
  डॉ. घपेश पुंडलीकराव ढवळे
  ghapesh84@gmail.com
  M. 8600044560

No comments:

Post a Comment