फ्लॉयड हा आफ्रिकन-अमेरिकन नागरिक मागील पाच वर्षांपासून एका रेस्टॉरंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. अलीकडे कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नोकरीही हातून गेल्यामुळे त्याच्या अडचणीत भरच पडली होती. २५ मेला मिनियापोलिसचे पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांनी फ्लॉइडला ताब्यात घेतलं. बनावट चलनाचा वापर करण्याच्या संशयातून फ्लॉयडला ताब्यात घेत असताना अत्यंत अमानुष रीतीने वंशभेदातून त्याचा खून करण्यात आला, तेही दिवसाढवळ्या नागरिकांच्या गराड्यात...
पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांनी फ्लॉयडला खाली पाडून त्याच्या मानेवर स्वत:चा गुडघा रोवून धरला होता. वेदना आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने फ्लॉयडने त्याची मान मोकळी करण्यासाठी खूप गयावया केली, परंतू चौविन या अधिकाऱ्याने तब्बल सात मिनिटं जॉर्ज फ्लॉयडच्या मानेवर आपला गुडघा तसाच दाबून ठेवला. फ्लॉयड ‘मला सोडा, श्वास घ्यायला त्रास होतोय’असं म्हणत, आजूबाजूच्या पोलिसांनाही जीव वाचवण्याची विनंती करत होता. पण चौविन आणि त्याच्यासोबतच्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तिथं जमा झालेल्या गर्दीतील अनेकांनी घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं, दरम्यान फ्लॉयडचा मृत्यू झाला. या हत्येचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर अमेरिकेतल्या विविध प्रांतात मोठा जनक्षोभ निर्माण झाला. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ असा आशय लिहिलेले फलक घेऊन अधिकाधिक लोक निदर्शनांसाठी जमू लागले. 'जस्टिस फॉर जॉर्ज' आणि 'ब्लॅक लाइव्हज मॅटर' सारख्या घोषवाक्यांनी अनेक शहरं दुमदमू लागली. अमेरिकेतल्या अनेक प्रांतात या आंदोलनांमुळे जवळपास आणीबाणीची परिस्थितीच निर्माण झाली आहे.
पोलिस सेवा करतात, मदत करतात, सरंक्षण करतात. जॉर्ज फ्लॉयड मदतीची भीक मागत होता, त्याला श्वासही घेता येत नव्हता, ते त्याला अटक करू शकत होते, शिक्षा देऊ शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्याच्या मानेवर गुडघा दाबून त्याचा जीव घेतला. जनावरांनाही अशी वागणूक कोणी देत नाही, अशी वागणूक जॉर्ज फ्लॉयडला दिली. पण या अमेरिकन पोलिसांच्या वंशभेदी वर्तणुकीचा तीव्र निषेध!
भारत आणि अमेरिका दोन्ही स्वतंत्र देश आणि लोकशाहीप्रधान सुद्धा !!
"अमेरिकेत वर्णवाद गेल्या कित्येक वर्षांपासून आहे पण हळूहळू तिथे सुधार होत आहे तिथल्या काही विवेकवादी लोकांनी वर्णवाद संपविण्याच्या दिशेने पाऊले उचलली.
" बराक ओबामा हे एक त्याच ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.
-- काल परवा एका काळ्या माणसाची हत्या करण्यात आली. तेव्हा ही अमेरिका राष्ट्रभवनाच्या आजूबाजूला गोळा झाली तिथल्या प्रशासकला वेठीस धरलं.
मेला तो काळा होता आणि निषेध गोरे लोक करत होते.
हे असे चित्र का? अस गांभीर्याने विचार केला तर तिथला वर्णवाद तिथल्या लोकांना संपवायचा आहे.
अमेरिकेच्या उज्वल राष्ट्राध्यक्षच्या यादीत "डोनाल्ड ट्रम्प हे नाव काळाक्षराने लिहल जाईल.
त्याचा अहंकार आणि सत्तेचा दुरुपयोग अमेरिकेने उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.
पण अमेरिकेकडे डोळे आहे ते डोळस आहेत योग्य अयोग्य याची जाणीव त्यांना आहे .....
पण भारताचा काय?
भारतात एक भोतमांगे गळफास लावून मरतो.
सागर ची हत्या होते ते ही चौकात पण देश एकत्र येत नाही.
उन्नाव प्रकरण पिढीतेला जाळलं जात, तिचं घर पेटवल्या जात.पायल तडवी ला आत्महत्या करावी लागते, रोहीत वेमुलाची हत्या केली जाते.ऊना मध्ये दलीताना मारले जाते. परत जुनेद वगैरे बरेच काही देशात होतात. पन देश गर्भगडीत थंडच असते. काही पिडीत आवाज उठवतात पन त्यांचाही आवाज दाबल्या जातो.
तिथला वर्णवाद इथला जातीवाद?
ते मिटविण्यासाठी एकत्र आलेत अन आपण हत्या ज्याची होती त्याची जात शोधण्यात मशगुल असतो.
जातीवरून आम्ही एकत्र येतो "ज्या जातीचा मेला ते न्याय देतील लढतील... आपल्यासाठी मेला तो माणूस होता हे महत्वाचं नाही का?
देश,सत्ता,राजकारण, -- सरकारचे समर्थक असावे पण चुकीला विरोध करणारे समर्थक..
अन विरोधक असावे तर सरकारने केलेल्या चांगल्या कामाची स्तुती करणारे.
--भारतीय मीडिया एक पाऊल पुढे आहे. ती तुम्हाला कुठे गुरफटून ठेवायचं हे चांगलं ओळखून आहे.
या देशात अनेक हत्याकांड होतात हत्याकांड एवढे क्रूर असतात की त्यांना जवळून पाहिलं तर माणूस म्हणवून घेण्याची लाज वाटेल.
पण न्याय नेहमी जातीच्या आधारे??
बंधुत्व हा शब्द दोन्ही लोकशाहीत आहे.
पण ते त्या तत्वाशी प्रामाणिक आहेत ते तत्वनिष्ठ आहे.
मग आपली निष्ठा??
ज्या दिवशी एका माणसाची हत्या होईल आणि साऱ्या देशातल्या माणसे एकत्र येऊन निषेध नोंदवतील तो या भारत देशाचा सुवर्णमध्य असेल......
by
डॉ. घपेश पुंडलिकराव ढवळे नागपुर
ghapesh84@gmail.com
M. 8600044560
No comments:
Post a Comment